Posts

  मापन व मापनाची साधने मूलभूत राशी :   वस्तुमान अंतर काळ तापमान इत्यादी मूलभूत राशी आहेत. त्यांच्या एककांना मूलभूत एकके म्हणतात. साधीत राशी :    मूलभूत राशींचा उपयोग करून साधीत राशी तयार होतात .उदाहरणार्थ क्षेत्रफळ आकारमान इत्यादी साधीत राशींची एकके मूलभूत एककापासून तयार होतात . त्यांना साधीत एकके असे म्हणतात.  मापन पद्धतीचे प्रकार 1 ब्रिटिश पद्धत  2 मॅट्रिक पद्धत  3 आंतरराष्ट्रीय एस आय पद्धत ब्रिटिश पद्धत :   या पद्धतीत लांबी मापनासाठी फूट किंवा इंच वजन मापनासाठी पाउंड व वेळ मापनासाठी सेकंद हे एकक वापरतात. मॅट्रिक पद्धत  :  या पद्धतीत एम के एस व सीजीएस अशा दोन पद्धती आहेत. अक्र राशी MKS  पद्धत एकक CGS पद्धत एकक 1 अंतर / लांबी मापन मीटर  ( M ) सेंटीमीटर ( C) 2 वस्तुमान मापन  किलोग्रॅम ( Kg ) ग्रॅम ( G ) 3 वेळ मापन सेकंद  ( S ) सेकंद  ( S ) ही पद्धत प्रचलित पद्धत आहे. लहान मोठी एकके 1, 10, 100 अशा प्रमाणात असतात त्यामुळे हिशोब सोपा होतो. आंतरराष्ट्रीय पद्धत :  (  सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल )  या पद्धतीचा उपयोग जगभरातील मापन पद्धतीत समानता आणण्यासाठी आणि मुख्यत्वे संशोधनात वापरण्यासाठी